जिल्ह्यातील सर्व दुकानांबाबतचा निर्णय उद्या शक्य, शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 07:18 PM2021-07-08T19:18:39+5:302021-07-08T19:31:54+5:30
corona virus Kolhapur : जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद बाबतचा निर्णय उद्या शक्य जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर घेण्यात येईल तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले.
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद बाबतचा निर्णय उद्या शक्य जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर घेण्यात येईल तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले.
राज्य शासनाने घालून दिलेल्या अटीनुसार शुक्रवारी दुपारी चारनंतर अत्यावश्यक वगळता शहरातील सर्व प्रकारची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले.
तीन महिने दुकाने बंदमुळे व्यापाऱ्यांचा वाढता असंतोष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने कोल्हापूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी ४ वाजता या परवानगीची मुदत संपत आहे, पार्श्वभुमीवर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा शल्यचिकित्स क डॉ. अनिल माळी उपस्थित होत्या.
डॉ. बलकवडे म्हणाल्या, शासनाने शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आज दुपारी ४ नंतर अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद राहतील. दर शुक्रवारी मागील आठवड्याचा कोरोना पॉझीटिव्हीटी रेट आणि आकडेवारी शासनापुढे ठेवली जाते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळ्या ४ स्तरांमध्ये केला जातो. शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे. सायंकाळी कोल्हापूरबाबतचा आदेश येईल. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व दुकानांबाबतचा निर्णय घेतला जाईल. तरी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बुधवारी राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद असून शुक्रवारपासून व्यवसाय सुरू होतील असे सांगितले होते. मात्र जिल्हा प्रशासनाला अजूनही त्याबाबतचे आदेश मिळालेले नाहीत. त्यात शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन आहे त्यामुळे या काळात व्यवसाय बंदच राहतील. सोमवारपासून कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील व्यवसाय सुरू होतील की नाही हे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट झाल्यावरच कळणार आहे.