कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:49+5:302021-07-08T04:17:49+5:30
जयसिंगपूर : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य ...
जयसिंगपूर : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
ज्या विभागामध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावांमधील छोटे-मोठे व्यवसाय सुरू व्हावेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी केली होती.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या या प्रयत्नाला यश आले असून, शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय व उद्योग सुरू करण्यास मुभा मिळणार आहे.
----------------------
कोट - कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सातत्याने बंद राहत असल्यामुळे हा सर्व व्यापारी वर्ग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शुक्रवारपासून शासन नियमानुसार सर्व व्यवहार सुरू होणार आहेत.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्यमंत्री
फोटो - ०७०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी, याबाबत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन चर्चा केली.