'सारे शहर-आले सायकलवर', लोकमत ग्रीन कोल्हापूर राईडला उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 12:13 PM2018-11-25T12:13:56+5:302018-11-25T18:25:31+5:30
लोकमतने कोल्हापूर कचरामुक्त आणि ग्रीन बनविण्यासाठी एक मोहिमेचा भाग म्हणून ग्रीन कोल्हापूर सायकल राईडचे आयोजने केले होते.
कोल्हापूर - मुंबई, पुण्यानंतर आता लोकमततर्फेकोल्हापूर येथे रविवारी ग्रीन कोल्हापूर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीला शहरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. या रॅलीत 1200 हून अधिक सायकलस्वार सामील होते. विशेष म्हणजे अगदी 4 वर्षाच्या बालकापासून ते 65 वर्षांच्या आजोबांपर्यंत सायकलस्वारांनी हिरीरीने सहभाग घेत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.
लोकमतने कोल्हापूर कचरामुक्त आणि ग्रीन बनविण्यासाठी एक मोहिमेचा भाग म्हणून ग्रीन कोल्हापूर सायकल राईडचे आयोजने केले होते. या सायकल राईडला कोल्हापुरकरांनी उत्तम प्रतिसाद देत शहर स्वच्छतेसाठी एक पाऊल टाकले आहे. या रॅलीसाठी नॉर्थ सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, dpsp वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, रेडिओ मिर्ची, दोशी सायकल, रिकव्हरी पार्टनर, विनटोजिनो, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब, एक्सप्लोरर कोल्हापूर व कॊल्हापूर सायकलिंग क्लब यांचे सहकार्य लाभले. पर्यावरण रोखणे आरोग्य जपणे हाच संदेश आजच्या या लोकमत रॅलीतून देण्यात आला. कोल्हापूरवासियांनी यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत उपक्रमाची शोभा वाढवली.
शहरातील हॉटेल सयाजी, साज लॉन, टेंबलाई उड्डाणपूल, केएसबीपी पार्क, शाहू टोलनाका, शिवाजी विद्यापीठ कॅम्पस ते पुन्हा टेंबलाई उड्डाणपूल ते हॉटेल सयाची या मार्गावर ही रॅली शिस्तबद्ध रितीने पार पडली. रविवारची सुट्टी असल्याने सर्व सामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी झाले होते. काव्या तुषार दोशी व गीता तुषार दोशी या दोघी लहान बहिणी आपल्या छोटू भुभू ब्राऊनीसोबत लोकमत रॅली सहभागी झाल्या होत्या. तर, वैविध्यपूर्ण वेशभूषा साकारत व जुन्या पूर्वीच्या लांब सीट असलेल्या सायकली घेऊन येथील एका ग्रुपने सर्वांचे लक्ष वेधत परंपरा व एकजुटीने रहाण्याचा संदेश दिला.
पाहा व्हिडीओ -