गॅलेक्सी हॉस्पिटलतर्फे सर्वरोग आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:36 AM2020-12-14T04:36:46+5:302020-12-14T04:36:46+5:30
ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरामध्ये हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवरती ...
ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरामध्ये हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवरती मार्गदर्शन करणार असून, मधुमेह, किडनी प्रोफाइल, आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी आणि एक्स-रे वरती ५० टक्केची सवलतदेखील देण्यात येणार असल्याचे डॉ. विराजराव कोरे यांनी सांगितले.
या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुचेता कोरे, डॉ. सिद्धार्थ कोरे, डॉ. महादेव पाटील, डॉ. निखिलचंद्र महाजन, डॉ. दिनेश धर्माधिकारी, डॉ. आकाश पाचानी, डॉ. व्ही. व्ही. पाटील, डॉ. शाम कार्वेकर, आदी तज्ज्ञ डॉक्टर्स व त्यांची टीम तपासणी करणार आहे.
विशेष म्हणजे या दिवशी हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड-१९ ओपीडी या नवीन सेंटरचा प्रारंभ करण्यात येणार आहे. आपल्या भागातील ज्या लोकांना कोविड-१९ होऊन गेला आहे, त्यानंतर घ्यावयाची काळजी अथवा उपचार केले जाणार असून, आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. कोरे यांनी केले आहे.