‘सर्किट बेंच’साठी सर्व प्रयत्न करणार

By admin | Published: May 4, 2016 12:09 AM2016-05-04T00:09:37+5:302016-05-04T00:09:37+5:30

प्रकाश मोरे : जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

All efforts will be made for the 'circuit bench' | ‘सर्किट बेंच’साठी सर्व प्रयत्न करणार

‘सर्किट बेंच’साठी सर्व प्रयत्न करणार

Next

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी राज्य शासन व न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केला.
यावेळी ‘सर्किट बेंच’च्या लढ्यासंदर्भात बोलताना मोरे म्हणाले, गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्णांतील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धीरेंद्र वाघेला यांची भेट घेऊन यासंबंधी पाठपुरावा केला जाणार आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील, सचिव सर्जेराव खोत, खजानिस प्रशांत पाटील, सदस्य गुरू हारगे, यतिन कापडिया, शहाजी पाटील, मेघा पाटील, अनुजा देशमुख, मनोहर पोवार, धैर्यशील पोवार, संदीप चौगुले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शेंडा पार्कातील जागेची मागणी करणार
राज्य शासनाने कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी ११०० कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे, पण हा निधी कोणत्या तरतुदीखाली जाहीर केला आहे, याचा पाठपुरावा करणार आहे.
सायबर कॉलेजच्या पिछाडीस असलेली नऊ एकर जागा ‘सर्किट बेंच’च्या न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी राखीव ठेवण्यात आली. त्यामुळे ‘सर्किट बेंच’साठी शेंडा पार्क येथील शासकीय जागेची मागणी करणार आहे.


कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी डावीकडून कार्यकारिणी सदस्य गुरू हारगे, खजानिस प्रशांत पाटील, यतिन कापडिया, सचिव सर्जेराव खोत, अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अरुण पाटील, शहाजी पाटील, मेघा पाटील, अनुजा देशमुख, मनोहर पोवार, धैर्यशील पोवार, संदीप चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: All efforts will be made for the 'circuit bench'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.