सर्व खासदारांना शाहू गौरव ग्रंथाची भेट; राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ मागणीसाठी पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:56 AM2018-11-05T00:56:45+5:302018-11-05T00:56:49+5:30

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय ...

All members of Shahu Gaurav Grantha visit; Rajarshi Shahu support for Bharat Ratna demand | सर्व खासदारांना शाहू गौरव ग्रंथाची भेट; राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ मागणीसाठी पाठबळ

सर्व खासदारांना शाहू गौरव ग्रंथाची भेट; राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ मागणीसाठी पाठबळ

googlenewsNext

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी संसदेचे लक्ष वेधले होते. या मागणीचा पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित गौरव ग्रंथ भेट म्हणून पाठविला आहे. देशातील सर्वच खासदारांनी राजर्षी शाहंूचे चरित्र वाचावे आणि या महान लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीचे औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना एक अनोखी भेट दिली आहे. ही भेट कोल्हापूरचे दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला चरित्र ग्रंथ होय. हा ग्रंथ वाचल्यानंतर सर्व खासदार राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितील आणि त्यातून मागणी पूर्णत्वास जाईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी यापूर्वीच केली आहे. त्यासाठी त्यांनी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला, तर कोल्हापुरातील विविध व्यक्ती, संस्था यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून राजर्षी शाहूंना ‘भारतरत्न’ देण्याबाबत विनंती करावी, असे आवाहन केले होते. त्याचा पाठपुरावा म्हणून महाडिक यांनी सर्व खासदारांना शाहू चरित्र ग्रंथ भेट म्हणून पाठविला आहे.

Web Title: All members of Shahu Gaurav Grantha visit; Rajarshi Shahu support for Bharat Ratna demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.