कनेक्शनसाठी सर्व पैसे भरतो म्हटले तरी ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:23 AM2019-05-01T00:23:32+5:302019-05-01T00:23:37+5:30

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर ...

All the money is paid for the connection | कनेक्शनसाठी सर्व पैसे भरतो म्हटले तरी ठेंगा

कनेक्शनसाठी सर्व पैसे भरतो म्हटले तरी ठेंगा

Next

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर तीन वर्षांपासूनची कनेक्शन प्रलंबित आहेत. स्वखर्चाने कनेक्शन घेतो म्हटले तरी त्याला परवानगी देण्याचीही तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. या कारभारामुळे कोल्हापुरातील शेतकरी संतप्त झाले असून कनेक्शन मिळणार तरी कधी? असा सवाल करीत आहेत. मोर्चाद्वारे धडक देऊन झोपलेल्या यंत्रणेला जागे करण्याच्या मानसिकतेपर्यंत शेतकरी आले आहेत.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषिपंपाद्वारे शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यासाठी वीज कनेक्शन अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणकडे या संदर्भात अर्ज करून प्रसंगी रक्कमही भरून ठेवली आहे. तथापि, कनेक्शनसाठी शासनाकडून लवकर परवानगी मिळत नाही, टी. सी. अपुरे आहेत, पोलच उपलब्ध नाहीत, सर्व्हिस वायर नाहीत, फ्युज कमी प्रमाणात आहेत, अशी अनेक
कारणे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांना थातुरमातुर उत्तरे दिली जात आहेत.

ताराबाई पार्कातील कार्यालयात फाईल पडून
एकेका वीज कनेक्शनसाठी किमान लाख, दीड लाखाचा खर्च येतो. शासनाकडून निधी येत नसल्याने लवकर कनेक्शन देता येत नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात; पण हेच अधिकारी मात्र कनेक्शनसाठी लागणारा तीन-चार लाखांचा सर्व खर्च स्वत: करण्यास तयार असणाºया शेतकºयांनाही परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ‘करवीर’मधील एका शेतकºयाने मागितलेल्या परवानगीचा अर्ज ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयात पडून आहे.

कायदा काय सांगतो
वीज कायदा २००३ चे कलम ४३ नुसार वीजपुरवठा संहिता २००५, ३ नुसार विहीत मुदतीत वीज कनेक्शन देणे महावितरणवर बंधनकारक आहे. असे असूनही साधनसामग्री नाही असे सांगून कनेक्शन देण्यास टाळाटाळ होत आहे. कनेक्शनचा खर्च स्वत: केला तर त्याची भरपाई वीज बिलातून होणे अपेक्षित असताना परत त्याचा बोजा शेतकºयांवरच टाकला जात आहे.

मी भागाने शेती करतो, महावितरणकडे कनेक्शनसाठी अर्ज करूनच घ्यावा असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. दोन एकर शेती व पाच एचएपीच्या मोटरपंपासाठी चार लाखांचा टीसी बसवणे आवाक्यापलीकडचे असल्याने नकार दिला. माझ्या शेताच्या १२० फुटांवर थ्री फेजची विद्युतवाहिनी असतानाही तेथून कनेक्शन देण्याऐवजी स्वतंत्र टी.सी.ची अट घालून चार महिन्यांपासून अडवणूक सुुरू आहे. ताराबाई पार्कातील कार्यालयात अधिकाºयांची भेट घेतली तर ते दाद लागू देत नाहीत.
- भानुदास माने, शेतकरी, शिरोळ

Web Title: All the money is paid for the connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.