आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:06 PM2020-12-08T15:06:10+5:302020-12-08T15:10:53+5:30

BharatBand, FarmarStrike, Ajra, Kolhapur केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.

All-party rally in Ajmer closed | आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद

आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद

googlenewsNext
ठळक मुद्देआजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंदबंदमध्ये सर्व पक्ष संघटना सहभागी

आजरा : केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.

शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकऱ्यांचे वाटोळे लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
रॅली संभाजी चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात सर्वांनीच जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना न्याय द्या, स्वाभिमाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कृषी विधेयक रद्द करा अशीही मागणी करण्यात आली.

रॅलीत मुकूंद देसाई, जयवंत शिंपी, विष्णूपंत केसरकर, उदय पवार, अल्बर्ट डिसोझा, संपत देसाई, तानाजी देसाई, अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संभाजी पाटील, युवराज पोवार, नौशाद बुढ्ढेखान, ओंकार माद्याळकर, रवी भाटले यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

 रॅलीत प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा करून सहभाग घेतला तर सभेतील मनोगतात म. फुले यांचे कृषी धोरण व त्याची अंमलबजावणी करणेची मागणी केली., एस. टी. सेवा सकाळपासूनच बंद, शाळा, महाविद्यालयाकडे विद्यार्थी फिरकलेच नाहीत.

 उत्तूर परिसरात शंभर टक्के प्रतिसाद

उत्तूर : कृषी विधेयक धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये उत्तूर परिसरातील जनतेने सर्व व्यवहार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. बंदला महाविकास आघाडी, जनता दल यांनी पाठिंबा दिला.

हलकर्णी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) परिसरात शासकीय बँका, बस व वैद्यकिय सेवेसह अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये भाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता.
 

Web Title: All-party rally in Ajmer closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.