सर्व परवानग्या पावसाळ््यात मार्गी

By admin | Published: June 17, 2015 12:17 AM2015-06-17T00:17:21+5:302015-06-17T00:38:22+5:30

आयुक्त : थेट पाईपलाईनबाबत सोमवारी ‘वन्यजीव’च्या परवानगीसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक

All permissions in the rainy season | सर्व परवानग्या पावसाळ््यात मार्गी

सर्व परवानग्या पावसाळ््यात मार्गी

Next

कोल्हापूर : शहरवासीयांचे गेल्या तीन दशकांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना वन्यजीव, वनविभाग, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. यातील ‘वन्यजीव’च्या परवानगीसाठी सोमवारी (दि. २२) राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. यानंतर प्रस्ताव केंद्राकडे जाईल. दरम्यान, इतर शासकीय परवानग्या येत्या तीन महिन्यांत पूर्ण करु. ठरलेल्या वेळेत पाईपलाईनचे काम पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी बोलताना दिली.
पाईपलाईनसाठी केंद्र व राज्याचा निधी उपलब्ध होऊनही हे काम विविध शासकीय परवानग्यांच्या त्रांगड्यात अडकल्याने वेळेत सुरू झाले नाही. आता योजनेचा सध्याचा खर्च ४८९ कोटी रुपयांवर गेला. वाढलेल्या ६० कोटी खर्चाची जमवाजमवही महापालिकेने केली. मात्र, वन्यजीव विभागाची परवानगी नसल्याने योजनेचे काम प्राथमिक टप्प्यात थांबवावे लागले होते. मात्र, ‘वन्यजीव’च्या परवानगीचा खडतर मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. मुख्य वन्यजीव संरक्षक व राधानगरीतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मुंबईतील अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षकांच्या अभिप्रायाने नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षकांनी पाईपलाईनला हिरवा कंदील दाखविला. सोमवारी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाची मोहोर उमटण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या ‘नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ’ यांच्या अंतिम संमतीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात महापालिकेने २१ किलोमीटरसाठी वन विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग व पीडब्ल्यूडीकडे जागा ताब्यात देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. या परवानग्या स्थानिक पातळीवरील असतानाही यास निव्वळ राजकीय कारणास्तव विरोध होत असल्याची चर्चा आहे. पाटबंधारे विभागाने ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ प्रकार सुरू केला आहे; तर जिल्हा परिषदेने नागाळा पार्कातील सभागृहाच्या वाढीव बांधकामाच्या परवानगीसाठी पाईपलाईनचे काम अडकवून ठेवल्याची चर्चा आहे. पावसाळ््यानंतर पाईपलाईनाच्या कामास गती येईल. काम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.


वनविभागाची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. इतर विभागांच्या परवानगीसाठी पावसाळ्याच्या कालावधीत जोरदार प्रयत्न केले जातील. आतापर्यंत दीड किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर पाईपलाईनच्या कामास गती आलेली दिसेल.
- पी. शिवशकंर, आयुक्त



माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कॉँग्रेसचे नगरसेवक आज, बुधवारी थेट पाईपलाईन कामाचा आढावा घेणार आहेत. कामाची गती व येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पाईपलाईनच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेणार आहेत.

Web Title: All permissions in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.