CoronaVirus In Kolhapur : जिल्ह्यातील सर्व निर्बंध कायम,जिल्हा प्रशासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 08:00 PM2021-06-11T20:00:39+5:302021-06-11T20:02:05+5:30

CoronaVirus In Kolhapur : मागील आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या व ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम ठेवले आहेत, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले. सध्याचे निर्बंध १५ जूनपर्यंत आहेत परंतू रुग्णसंख्येचा आढावा प्रत्येक गुरुवारी (दि.१७) घेतला जातो व त्यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासन निर्णय घेते. त्यामुळे कोल्हापूरच्या निर्बंधाबाबत पुढील शुक्रवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे.

All restrictions in the district maintained, orders of the district administration: Permission for services currently in operation | CoronaVirus In Kolhapur : जिल्ह्यातील सर्व निर्बंध कायम,जिल्हा प्रशासनाचे आदेश

CoronaVirus In Kolhapur : जिल्ह्यातील सर्व निर्बंध कायम,जिल्हा प्रशासनाचे आदेश

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व निर्बंध कायम,जिल्हा प्रशासनाचे आदेश सध्या सुरू असलेल्या सेवांना परवानगी

कोल्हापूर : मागील आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या व ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम ठेवले आहेत, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचे आदेश काढले. सध्याचे निर्बंध १५ जूनपर्यंत आहेत परंतू रुग्णसंख्येचा आढावा प्रत्येक गुरुवारी (दि.१७) घेतला जातो व त्यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासन निर्णय घेते. त्यामुळे कोल्हापूरच्या निर्बंधाबाबत पुढील शुक्रवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची चार स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ही विभागणी मागील आठवड्यातील पॉझीटिव्ह रेट व ऑक्सीजन बेडवरील रुग्ण यावरुन ठरवली जाते. कोल्हापुरात ४ ते १० जून या आठवड्यात पॉझीटिव्ह रेट १० टक्के पेक्षा जास्त व २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर ऑक्सीजन बेडवरील रुग्ण ६० टक्केपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी स्तर ४ चे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत. यानुसार सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम राहतील.


याअंतर्गत सध्या सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवांना सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत परवानगी राहील. केशकर्तनालये, व्यायामशाळा, स्पा, ब्युटी पालर्र, वेलनेस सेंटर हे ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत परवानगी असेल. शुक्रवारी सायंकाळ पासून ते रविवारपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय फिरता येणार नाही.

 

Web Title: All restrictions in the district maintained, orders of the district administration: Permission for services currently in operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.