करवीर, भुदरगड, शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यातील सर्व सरपंच निवडी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:07 PM2021-02-06T18:07:45+5:302021-02-06T18:07:53+5:30

ज्या तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

All Sarpanch elections in Karveer, Bhudargad, Shirol and Panhala talukas have been postponed | करवीर, भुदरगड, शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यातील सर्व सरपंच निवडी लांबणीवर

करवीर, भुदरगड, शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यातील सर्व सरपंच निवडी लांबणीवर

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ, भुदरगड आणि पन्हाळा या तालुक्यातील सरपंच निवडीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज स्थगिती दिली आहे. यामुळे या चार तालुक्यातील सरपंच निवडी लांबणीवर पडल्या आहेत. हे तालुके सोडून उर्वरित आठ तालुक्यातील सरपंच निवडी ठरल्याप्रमाणे ९ फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत.

ज्या तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, त्या तालुक्यातील सर्वच ग्राम पंचायतीच्या सरपंच निवडी लांबणीवर पडल्या आहेत. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या सरपंच पदाच्या निवडी संदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

Web Title: All Sarpanch elections in Karveer, Bhudargad, Shirol and Panhala talukas have been postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.