कबनूर ग्रामपंचायतीच्या सर्व जागा स्वबळावर लढविणार : आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:55+5:302020-12-16T04:37:55+5:30
ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार आवाडे म्हणाले, गावातील पाणंद, रस्ते, स्ट्रीट लाईट, ...
ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
आमदार आवाडे म्हणाले, गावातील पाणंद, रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणंद गटारी, पाणी, घनकचरा, वाढीव पाईपलाईन, इनामी जमिनीचा प्रश्न, झोपडपट्टीतील समस्या, आदी प्रश्न सोडविण्यासाठी ताराराणी पक्ष कोणाशीही आघाडी न करता निवडणूक लढविणार आहे. या सर्व प्रश्नांचा जाहीरनाम्यामध्ये समावेश असेल.
इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून २० डिसेंबरला मुलाखती घेऊन २१ डिसेंबरला उमेदवार जाहीर केले जातील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, सुधाकर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
मधुकर मणेरे यांनी स्वागत केले. बैठकीस रावसाहेब खवरे, बबन केटकाळे, नीलेश पाटील, कुमार कांबळे, जावेद फकीर, सुधीर लिगाडे, अभिजित खवरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदीप मणेरे यांनी आभार मानले.
(फोटो ओळी)
१५१२२०२०-आयसीएच-०१
कबनूर (ता. हातकणंगले) येथील पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राहुल आवाडे, सुधाकर कुलकर्णी, रावसाहेब खवरे, बबन केटकाळे, आदी उपस्थित होते.