शहरातील सर्व दुकाने आजपासून उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:05+5:302021-06-28T04:18:05+5:30
तातडीने ‘कोल्हापूर चेंबर’कडे संपर्क साधा शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, आदी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू ...
तातडीने ‘कोल्हापूर चेंबर’कडे संपर्क साधा
शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, आदी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू करावीत. ग्राहकांसाठी कोरोना नियमांच्या पालनाबाबतचे आवाहन करणार फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावावेत. दुकाने बंद करण्यास प्रशासनाचे अधिकारी आल्यास त्यांच्याशी वाद, हुज्जत घालू नका. त्यांना शांततेत विरोध करा. तातडीने ‘कोल्हापूर चेंबर’च्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संजय शेटे यांनी केले.
चौकट
शासनाने व्यापाऱ्यांसाठी काहीच केले नाही
दुसऱ्या लाटेच्या प्रारंभी कोरोना रुग्णांची संख्या कमी असतानाही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला साथ दिली. व्यापाऱ्यांमुळे कोरोनाचा फैलाव होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसताना प्रशासनाने व्यापाऱ्यांना वेठीस धरत त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले. गेले ८० दिवस दुकाने बंद राहिल्याने व्यापारी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे आता निर्बंध कायम राहून दुकाने बंद राहिल्यास व्यापारी, व्यावसायिकांची अवस्था आणखी बिकट होणार आहे. आर्थिक पॅकेजची मागणी करूनही शासनाने व्यापारी, व्यावसायिकांसाठी काहीच केले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा न करता आम्ही सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे संजय शेटे यांनी सांगितले.
कोण, काय, म्हणाले?
प्रदीपभाई कापडिया : जे काही परिणाम होतील ते होऊ देत आपण ‘कोल्हापूर चेंबर’ बरोबर ठाम राहायचे.
आनंद माने : सर्व व्यापार, व्यवसाय सुरू करण्यावर आम्ही ठाम आहोत. हे सर्व सुरळीतपणे चालण्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे.
कुलदीप गायकवाड : सराफ संघाचा ‘कोल्हापूर चेंबर’च्या निर्णयाला पाठिंबा असून सर्व सराफ दुकाने सोमवारपासून सुरू केली जातील.
सीमा जोशी : आपण एकजुटीने दुकाने सुरू करू या. एकमेकांना साथ देवून शांततेने लढा देवू या.
फोटो (२७०६२०२१-कोल-चेंबर बैठक आणि ०१) : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात रविवारी व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी जाहीर केला. यावेळी डावीकडून संजय पाटील, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२७०६२०२१-कोल-चेंबर बैठक ०२, ०३) : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात रविवारी व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी जाहीर केला. त्याला उपस्थित व्यापारी, व्यावसायिकांनी हात उंचावून पाठिंबा जाहीर केला. (छाया : नसीर अत्तार)