सर्व दुकाने चालू करण्यासाठी परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:46+5:302021-05-25T04:27:46+5:30
राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार दि. ५ एप्रिल २०२१ पासून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता इतर ...
राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार दि. ५ एप्रिल २०२१ पासून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. सर्व व्यापाऱ्यांना वीजबिल, कर्जाचे हप्ते, घरफाळा, परवाना फी, टेलिफोन बिल, विम्याचे हप्ते, कामगारांचे पगार, शासनाचे सर्व कर हे दुकान बंद असतानाही भरावे लागत आहेत. ते वेळेवर न भरल्यास त्यावर दंड व व्याज लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दुकाने बंद असल्याने माल खराब होण्याची शक्यता आहे. ऐन हंगामामध्ये वर्षातील ४० ते ४५ टक्के व्यवसाय होत असल्याने तो माल पडून आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक व जीवनावश्यकसह सर्व दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव धनंजय दुग्गे, इलेक्ट्रिकल मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी, कन्झ्युमर प्रोडक्टस् असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
चौकट
गर्दी टाळण्यासाठी वेळ वाढवावी
अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू आहेत. या वेळेत व्यवसाय करताना मालाची उपलब्धता होत नाही. त्यासह दुकानात गर्दी वाढत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वाढवून मिळावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे.
फोटो (२४०५२०२१-कोल-चेंबर निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी मिळावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले. यावेळी शेजारी संजय पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, कुलदीप गायकवाड उपस्थित होते.
===Photopath===
240521\24kol_10_24052021_5.jpg
===Caption===
फोटो (२४०५२०२१-कोल-चेंबर निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी मिळावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले. यावेळी शेजारी संजय पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, कुलदीप गायकवाड उपस्थित होते.