माऊलीसह सहाही आरोपींच्या पोलीसकोठडीत वाढ

By admin | Published: May 15, 2015 11:05 PM2015-05-15T23:05:07+5:302015-05-15T23:32:20+5:30

माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने ७ वर्षीय मुलाचे शिक्षक मधुकर चिंदकेच्या सहाय्याने अपहरण केले.

All the six accused in the police cell including Mauli have been arrested | माऊलीसह सहाही आरोपींच्या पोलीसकोठडीत वाढ

माऊलीसह सहाही आरोपींच्या पोलीसकोठडीत वाढ

Next

चिपळूण : आपल्या भोंदुगिरीने भक्तगण वाढवण्यासाठी एका बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माऊली वासंती कांबळीसह इतर ५ आरोपींना न्यायालयाने आज (शुक्रवारी) दि. १८पर्यंत पोलीसकोठडी वाढवली.
चिपळूण शहराजवळील कापसाळ गावी वासंती वसंत कांबळी या हॉटेलमध्ये पोळ्या लाटणाऱ्या महिलेने कलावती आर्इंच्या नावाने कापसाळ-फणसवाडी येथे सिध्दकला मठाची स्थापना केली. या मठाच्या माध्यमातून दर गुरुवारी ती प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेत असे. अगदी मूल होण्यापासून ते कॅन्सरवर उपचार करण्यापर्यंत साऱ्या गोष्टी माऊली साध्य करत असत, अशी अनेक भक्तांची श्रध्दा होती. आपले भक्त वाढावेत, यासाठी माऊलीचे विविध फंडे सुरु होते. त्यासाठी तिने कामथे हुमणेवाडी येथील नदीत एका दगडावर आपले स्वत:चे पाऊल कोरुन घेऊन ते कलावती आर्इंचे असल्याचे भासवले. येथील नदी अडवून तेथे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले.दिवसेंदिवस माऊलीची कीर्ती वाढवण्यासाठी आटापिटा सुरु असतानाच माऊलीचा एक जवळचा सेवेकरी प्रकाश बाईत तिला सोडून गेला. प्रकाशला अद्दल घडावी, तो पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी माऊलीने त्याच्या ७ वर्षीय मुलाचे माध्यमिक शिक्षक मधुकर चिंदके याच्या सहाय्याने अपहरण केले. या कटात प्राजक्ता ऊर्फ मंगला जावळे, सूरज दळवी, माऊलीची ब्ाहीण अर्चना वाजे व चिंदकेच्या बहिणीचा पती सूर्यकांत नलावडे यांनी तिला मदत केली. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आजपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा या सहाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
याप्रकरणी पोलीस तपास वेगाने सुरु आहे. प्रथमला घरातून उचलून नेताना प्राजक्ता जावळेला ज्यांनी पाहिले होते, अशा काही महिलांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)

काही भक्तांचे धाबे दणाणले
माऊलीच्या अटकेनंतर कामथे ग्रामस्थांनी नदीपात्रातील मंदिरे काढून टाकण्याबाबत आवाज उठविला व भक्तगणांना येथे येण्यास मज्जाव केला. त्यामुळे कामथे येथील मंदिराकडे एकही भक्तगण फिरकत नाही. माऊलीच्या मठातील कार्यक्रमही बंद झाले आहेत. सुरुवातीला काही काळ भक्तांनी माऊलीच्या सुटकेसाठी जपजाप केले. परंतु, आता माऊलीचे भांडे फुटल्याने भोंदुगिरी उघड झाली. त्यामुळे मठाकडेही भक्तगण फिरकत नाही. काही जवळच्या भक्तांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: All the six accused in the police cell including Mauli have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.