एक जूनपासून सर्वप्रकारचा व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:02+5:302021-05-28T04:19:02+5:30
कोल्हापूर : राज्यातील कोरोनाशी संबंधित घोषित निर्बंध दि. १ जून रोजी संपुष्टात येत असून, या दिवसापासून सर्वच व्यापार पूर्णवेळ ...
कोल्हापूर : राज्यातील कोरोनाशी संबंधित घोषित निर्बंध दि. १ जून रोजी संपुष्टात येत असून, या दिवसापासून सर्वच व्यापार पूर्णवेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे यासह अन्य मागण्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
महाराष्ट्राशेजारील विविध राज्यांत सर्वप्रकारचे व्यापार सुरू आहेत. त्यामुळे निर्बंध संपुष्टात आल्यानंतर व्यापार बंद राहिल्यास महाराष्ट्रातील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. ते टाळण्यासाठी दि. १ जूननंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचा, अशी व्यापार्यांची भूमिका असल्याने सरकारने आत्ताच दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. व्यापारी आणि त्यांच्या कर्मचार्यांसाठी लसीकरणाची विशेष व्यवस्था करण्याची मागणी केली असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.
चौकट
विशेष पॅॅकेज जाहीर करावे
दोन महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका, नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करावे, वेगवेगळ्या प्रकारच्या परवाना फीमध्ये एक वर्षाची माफी द्यावी, मालमत्ता कर, वीजबिल, कर्जावरील व्याज माफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापार्यांसाठी जाहीर करावे, अशी मागणी केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.