कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालय आवारात सर्व वाहनांना उद्यापासून बंदी

By Admin | Published: March 27, 2017 03:44 PM2017-03-27T15:44:26+5:302017-03-27T15:44:26+5:30

अभ्यासगत समितीच्या बैठकीत निर्णय : अतिक्रमण काढले नाही तर प्रशासनावर कारवाई : चंद्रकांतदादा

All vehicles in Kolhapur government hospital premises are banned from tomorrow | कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालय आवारात सर्व वाहनांना उद्यापासून बंदी

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालय आवारात सर्व वाहनांना उद्यापासून बंदी

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत


कोल्हापूर : राज्यात निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस होणाऱ्या हल्ल्याची दखल घेऊन येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) आवारात मंगळवारपासून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त देण्याचेही पोलिस प्रशासनाने मान्य केल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरात सांगितले. सोमवारी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयात अभ्यागत समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

सीपीआरमधील अतिक्रमणाबाबत कोणत्याही राजकिय नेत्यांचा अथवा मुख्यमंत्री यांचा जरी फोन आला तरी ते अतिक्रमण त्वरित काढावे, प्रशासनाने अतिक्रमण हलवले नाही तर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम चंद्रकांतदादा यांनी यावेळी दिला. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सीपीआरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्यासह अभ्यागत समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

डॉ. रामानंद यांनी, सीपीआरमध्ये एक रुग्णाबरोबर दोनच नातेवाईकांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. पण, त्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त पाहिजे व रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश पास देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करणार आहे. तसेच रिक्त पदे भरलेली नाहीत ती, त्वरित भरावी. शेंडापार्कमधील महाविद्यालयासाठी सुमारे सहा कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी, पोलिस अधीक्षक तांबडे यांच्याशी बोलून जादा पोलिस बंदोबस्त देऊ व अतिक्रमणासाठी लागणाराही पोलिस फौजफाटा देऊ, असे सांगितले.

यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आता रुग्णाबरोबर दोनच नातेवाईकांना सीपीआरमध्ये प्रवेश दिला. त्याला प्रवेशद्वाराजवळ थांबविले जाईल व कोणत्याही प्रकारचे वाहन आत सोडले जाणार नाही. येथील अतिक्रमण दोन एप्रिलच्या आत स्वत: हून काढून घ्यावे, अन्यथा प्रशासन अतिक्रमण काढेल. यावेळी समिती सदस्य सुनील करंबे म्हणाले, बेघर रुग्णांचे योग्य ते पुनर्वसन व्हावे, अनाधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्यावर कारवाई करावी, ड्रेनेज सिस्टिम कार्यरत नसल्याने अस्वच्छ पाणी व दुर्गंधी पसरते. त्याची सोय व्हावी. बैठकीस वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे ,अभ्यागत समितीचे महेश जाधव, डॉ.अजित लोकरे, डा ॅ. इंद्रजित काटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दादा म्हणाले...
तीन महिन्याचे पोलिस बंदोबस्ताचे पैसे भरु.
रिक्त पदे लवकरच भरु, त्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करु.
सीपीआरला लवकरच न्युरोसर्जन
सीपीआरची राजीव गांधी योजनेसाठी रेडिओवरुन जाहिरात करा
सोलर लवकरच बसवणार
रिसेप्शन कौऊंटर सुरु करणार
सरकारी वैद्यकिय अधिकाऱ्यांना खासगी व्यवसाय करता येणार नाही, करत असतील तर त्यांची यादी करा
वर्ग एक व दोनच्या कर्मचाऱ्यांसाठी सहा महिन्यातून एकदा बैठक
सीमा बांधवातील रुग्णांचे बिल माफ होण्यासाठी प्रयत्न करणार
मुख्य प्रवेशद्वाराजवळ नवीन पोलिस चौकीचा प्रस्ताव

गिरीश महाजन २० एप्रिल रोजी सीपीआरमध्ये येणार


सीपीआरमध्ये सीटी स्कॅन मशीन व ट्रामा केअर सेंटरच्या उदघाटनासाठी आणि वैद्यकिय अधिकाऱ्यांशी सर्वांशी संवाद साधण्यासाठी वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे २० एप्रिलला कोल्हापूरात येतील, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Web Title: All vehicles in Kolhapur government hospital premises are banned from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.