आलाहाबादचा युवक ठरतोय ‘ऑक्सिरिच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:27+5:302021-04-19T04:21:27+5:30
दत्तात्रय पाटील म्हाकवे : भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्येने हिमनगच गाठले आहे. हा रोग थेट माणसाच्या हृदयावरच मारा ...
दत्तात्रय पाटील
म्हाकवे : भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्येने हिमनगच गाठले आहे. हा रोग थेट माणसाच्या हृदयावरच मारा करत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना गंभीर परिस्थितीत आँक्सिजनची नितांत गरज असून कोरोनामुळे गेल्या वर्षापासून ऑक्सिजनचे(प्राणवायू) महत्त्व आणखी वाढले आहे. याचा विचार करून कागल तालुक्यातील आलाहाबादचा युवक मिलिंद बाबूराव चौगले यांनी डॉ. आशिष पाटील यांच्या सहकार्याने निपाणी येथिल श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्लँट उभारला आहे.
हवेतील ऑक्सिजन शोषून तो सिलिंडरमध्ये भरला जात आहे. वाढती मागणी पाहता हे काम २४ तास सुरू असून दररोज आँक्सिजनची ५०० सिलिंडर बाहेर पडत आहेत. मेडिकलचा व्यवसाय असणाऱ्या मिलिंद आणि स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन असणाऱ्या डॉ. आशिष यांनी सामाजिक दायित्व स्वीकारत ‘ना नफा...ना तोटा’ हे तत्त्व अंगीकारले आहे. त्यामुळे नैसर्गिक युद्धजन्य परिस्थितीच्या काळात हजारो गरजूंना ते मदतीचा हात देत आहेत.
कर्नाटकसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असून या प्लँटने सीमावासीयांना दिलासा मिळाला आहे.
मिलिंद यांचे वडील पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त असून मिलिंद हे औषध विक्रेते आहेत.
अशी होते प्रक्रिया...
हवेत साधारपणे १५ ते १८ टक्के ऑक्सिजन. तो कंप्रेसरच्या माध्यमातून शोषून घेतला जातो.
त्यातील कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो.
उर्वरित ऑक्सिजनवरही प्रक्रिया केली जाते.
फिल्टर यंत्रणेतून ऑक्सिजनचे विलगीकरण केले जाते.
शुद्ध ऑक्सिजन शोषून तो सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना दिला जात आहे
कोट...
कोट्यवधी खर्चाच्या या प्लँटची उभारणी
तरीही ना नफा.. ना तोटा तत्त्वाचा अवलंब
भविष्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी सातत्याने प्रयत्न
‘पूर्वी २० टक्के ऑक्सिजन सिलिंडर ही रुग्णालयांसाठी तर ८० टक्के औद्योगिक कंपन्यांसाठी वापरली जात परंतु,सध्या कोरोनाची महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज वाढली आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनांनुसार रुग्णांकडील ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ केली आहे. ही गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मितीत वाढ करण्याचा प्रयत्न करू
-
मिलिंद चौगुले, ऑक्सिजन प्लँटधारक, निपाणी