शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग : अजित नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:00 PM2018-10-24T13:00:30+5:302018-10-24T13:06:23+5:30

परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

The allegation of Chief Minister Ajit Navale's allegation against farmers' organizations | शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग : अजित नवले

शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग : अजित नवले

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योगमुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हास्यास्पद व पदाला न शोभणारे

कोल्हापूर :  ३५00 रुपये उसदर मिळावा यासाठी सरकारचा प्रमुख या नात्याने धोरणे घ्यायची सोडून स्वत: मुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हे हास्यास्पद व पदाला न शोभणारे आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरीशेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपानंतर डॉ. नवले यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. वारणा कोडोली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऊस परिषदेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नवले यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.

नवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी परिषदा घेण्याऐवजी साखरेला, उपपदार्थांना दर कसा जास्त मिळेल ते पाहावे, जेणेकरून शेतकऱ्यांना ३५00 रुपये दर मिळण्याची हमी मिळेल. हे न करता केवळ परिषदा घेऊन शेतकरी आणि शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे, त्यांना चिथावण्याचे काम करत असतील, तर राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांना आणि त्यांच्या पदाला शोभणारे नाही.

शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी भूमिका घेण्याची गरज असताना ते जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. साखरेचे दर घसरत असताना त्याविषयी निर्णय न घेता परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करण्याची भूमिका घेणे हे मुळातच हास्यास्पद आहे.

साखरेचे भाव कमी कसे राहतील हे पाहायचे, शेतकऱ्यांना उरले सुरलेच मिळेल, अशी एका बाजूला व्यवस्था करायची आणि दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे परिषद घेऊन आपणच शेतकऱ्यांचे कसे तारणहार आहोत, हे दर्शवणे म्हणजे त्यांचा शुद्ध खोटारडेपणा आहे.

 

Web Title: The allegation of Chief Minister Ajit Navale's allegation against farmers' organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.