ढपल्याचा आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत : पाटील

By admin | Published: May 28, 2017 12:58 AM2017-05-28T00:58:12+5:302017-05-28T00:58:12+5:30

इचलकरंजीतील भुयारी गटार योजना प्रकरण : दुसऱ्याचे श्रेय लाटणे थांबवा

The allegation of corruption is that the villagers are stooped up: Patil | ढपल्याचा आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत : पाटील

ढपल्याचा आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत : पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : येथील भुयारी गटार योजनेत मोठा ढपला पाडला असल्याचा भारतीय जनता पक्षाचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी केलेला आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचाच प्रकार आहे. तत्कालीन शहर विकास आघाडीचे सदस्य असलेल्या पक्षप्रतोदांनी या योजनेला मंजुरी देताना काय ‘अर्थ’ घेतला याचाही खुलासा करावा. सत्ता आली म्हणून सर्व चांगले आम्हीच केले असा कांगावा करून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवावा, असा टोला काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी लगावला आहे.
योजनेच्या परिस्थितीची पूर्ण माहिती न घेता सीआयडी चौकशी करण्याची मागणी म्हणजे बालीशपणाच दिसून येतो. शहापूर व कबनूर या वाढीव भागातील सांडपाण्याचा निचरा व्हावा व प्रदूषणाला आळा बसण्यासाठी केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेतून भुयारी गटर योजना मंजूर करण्यात आली.
आघाडीने सुरुवातीला या योजनेला विरोध करणार असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र सभेत आघाडीच्या सर्वच सदस्यांनी एकमताने या ठरावाला मंजुरी दर्शविली.
या योजनेसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी) जागा नगरपरिषदेच्या ताब्यात नसल्याची गंभीर बाब काँग्रेसचे तत्कालीन गटनेते बाळासाहेब कलागते यांनी उघडकीस आणली होती. त्याचेही श्रेय आता भाजप लाटू पाहत आहे.


योजनेच्या चौकशीची यापूर्वीच मागणी
योजनेचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू झाल्यानंतर काम निकृष्ट होत असल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. त्याची गांभीर्याने दखल घेत काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे १५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या पत्राद्वारे सदर योजनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केलेली आहे. त्याची प्रतसुद्धा आमदार सुरेश हाळवणकर यांना दिलेली आहे. त्याचबरोबर २९ जून २०१६ रोजीच्या पत्राद्वारे या योजनेची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करावी, अशी मागणीही बावचकर यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: The allegation of corruption is that the villagers are stooped up: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.