शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मदत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:37+5:302021-08-19T04:28:37+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, पुणे यांच्या वतीने कोळी समाजातील गरीब कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली. ...
कोल्हापूर : राज्य शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, पुणे यांच्या वतीने कोळी समाजातील गरीब कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली. सांगरुळ, कुडित्रेसह करवीर तालुक्यातील कोळी समाजातील महिलांना जीवनाश्यक वस्तूंचे कीट व आर्थिक मदतीचा धनादेशही देण्यात आला.
कोळी समाजातील पात्र लाभार्थींना सांगरुळचे उपसरपंच सुशांत नाळे यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक डी. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य रंगराव कोळी, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाळे, आनंदराव इंगळे, सागर कुंभार, सेवानिवृत्त सहायक फौजदार संभाजी कोळी, पांडुरंग विकास संस्थेचे माजी संचालक बाबूराव कोळी, बळीराम कोळी, सुधीर कोळी, संभाजी कोळी, स्वप्नील कोळी, दत्तात्रय कोळी, सुहास कोळी, सुनील कोळी, किरण कोळी, परशुराम कोळी, संपत कोळी, अमोल कोळी आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : राज्य शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सांगरुळ (ता. करवीर) येथील कोळी समाजातील गरीब कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली. यावेळी रंगराव कोळी, आनंदराव इंगळे, सचिन नाळे, सुशांत नाळे, डी. पी. पाटील, संभाजी कोळी आदी उपस्थित होते. (फोटो-१८०८२०२१-कोल-कोळी)