जयसिंगपुरात ॲलोपॅथी डॉक्टरांचा बंदमध्ये सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:54+5:302020-12-12T04:40:54+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल घोडके म्हणाले, अॅलोपॅथिक डॉक्टरांची भूमिका आयुर्वेद विरोधी नाही. अथवा आयुर्वेद वैद्याच्या विरोधात नाही. ...
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल घोडके म्हणाले, अॅलोपॅथिक डॉक्टरांची भूमिका आयुर्वेद विरोधी नाही. अथवा आयुर्वेद वैद्याच्या विरोधात नाही. मात्र, वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणाऱ्या मिक्सोपॅथीला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व अॅलोपॅथिक डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत दवाखाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.
यावेळी डॉ. वसुंधरा घोडके, डॉ. प्रिया खाडे, डॉ. सविता पाटील डॉ. ए. एस. पाटील, डॉ. शीतल पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. पद्मराज पाटील, डॉ. विक्रम जाईन, डॉ. बी. एस. पाटील,डॉ. राजेंद्र आलासे, डॉ. श्रीवर्धन पाटील, डॉ. अभिजित बिरनाळे, डॉ. फारुख फरास, डॉ. गौतम इंगळे, डॉ. अविनाश पाटील, डॉ. अनिल तकडे, डॉ. प्रवीण जैन, डॉ. नितीन पाटील, डॉ. शांता पाटील, डॉ. शैला पाटील यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.