corona in kolhapur- जीवनावश्यक वस्तूंच्या साडे आठ हजार किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:39 PM2020-04-13T15:39:31+5:302020-04-13T16:14:35+5:30

‘कोरोना विषाणू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गरजूंना १० जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे किट स्वीकारून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० ठिकाणी ९३९६ किट स्वीकारून त्यातील ८५४२ किट गरजंूना देण्यात आले आहेत.

Allotment of eight thousand kits of essential commodities | corona in kolhapur- जीवनावश्यक वस्तूंच्या साडे आठ हजार किटचे वाटप

corona in kolhapur- जीवनावश्यक वस्तूंच्या साडे आठ हजार किटचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्या साडे आठ हजार किटचे वाटपजिल्ह्यातील ३० ठिकाणी किट स्वीकारणे, अन्नवाटप सुरू

कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गरजूंना १० जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे किट स्वीकारून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० ठिकाणी ९३९६ किट स्वीकारून त्यातील ८५४२ किट गरजंूना देण्यात आले आहेत.

उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण अध्यक्षतेखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, नायब तहसीलदार सुहास घोरपडे, अर्चना कुलकर्णी, आदींसह सहाजणांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. ही महासैनिक दरबार हॉल येथे मदतीचे किट स्वीकारत आहे. तसेच येथून जिल्ह्यातील ३० ठिकाणांशी समन्वय साधून मदतीच्या वाटपाचा आढावा घेत आहे.

एकदम मोठ्या स्वरूपात किट्स असतील तर ते स्वीकारून जागेवरच गरजूंना याच ठिकाणी वाटप केले जात आहे. इतर किट्स घेऊन कोणती संस्था किंवा व्यक्ती येत असेल तर ते संबंधित कार्यक्षेत्रातील ‘पॉइंट आॅफ कलेक्शन अ‍ॅँड डिस्ट्रिब्यूशन’ (पीसीडी) पाठविले जात आहेत.

ही समिती कार्यान्वित झाल्यापासून गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील ३० ठिकाणी ९३९६ जीवनावश्यक वस्तूंचे किट प्राप्त झाले आहेत. त्यातील ८५४२ किटचे गरजवंतांना महापालिका, नगरपालिका, तहसीलदार कार्यालय स्तरावर वाटप करण्यात आले आहे. यातील ६०८ किट शिल्लक असून, त्याचेही वाटप लवकरच केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात ४८ हजार बिस्किट पुड्यांचे वितरण

महासैनिक दरबार येथील कार्यालयात जिल्ह्यातील नऊ ‘पीसीडी’ केंद्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांच्या माध्यमातून ४८ हजार ३८४ बिस्किट पुड्यांचे ३०४ बॉक्स वितरण करण्यात आले. कोल्हापूर महापालिकेसाठी ५०८८ बिस्किटांचे पुडे, करवीर तहसीलदार कार्यालयाला ५०८८, कागल तहसीलदार कार्यालयाला ८३०४, हातकणंगले तहसीलदार कार्यालयाला १०१७६, गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयाला २०६४, पन्हाळा तहसीलदार कार्यालयाला २०६४, चंदगड तहसीलदार कार्यालयाला ५०८८, गगनबावडा तहसीलदार कार्यालयाला ६३८४, शिरोळ तहसीलदार कार्यालयाला ४१२८ पुडे देण्यात आले आहेत.
 

 

Web Title: Allotment of eight thousand kits of essential commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.