पावित्र पोर्टल खुले करून भरतीला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:51+5:302021-02-13T04:22:51+5:30
कोल्हापूर : खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी असलेली पावित्र पोर्टल प्रणाली बंद आहे. ती खुली करुन या प्राथमिक ...
कोल्हापूर : खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी असलेली पावित्र पोर्टल प्रणाली बंद आहे. ती खुली करुन या प्राथमिक शाळांच्या मागणीप्रमाणे शिक्षक भरतीला परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने केली आहे. या समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी त्याबाबतचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले.
या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना बैठकीसाठी बोलविण्यात आले असून, याबाबतीत निर्णय घेण्यात येईल. सध्या बंद असलेली पवित्र पोर्टल प्रणाली चालू करुन आवश्यकतेनुसार भरतीची प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गायकवाड यांनी दिले. टप्पा अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक भरती सुरु करण्याबाबतचे निवेदन अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना दिले असल्याचे रसाळे यांनी सांगितले. यावेळी शरद केनवडे, सुनील कारंजकर, वैभव कांबळे उपस्थित होते.