सलून्स, पार्लर सुरू करण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:23+5:302021-04-07T04:26:23+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सलून व पार्लर व्यवसायावर घातलेली बंदी अन्यायकारक असून, यामुळे असंख्य ...
कोल्हापूर : राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सलून व पार्लर व्यवसायावर घातलेली बंदी अन्यायकारक असून, यामुळे असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी अटी व नियम घालून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकान मालक जनसेवा संघाने मंगळवारी केली. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
मागील लॉकडाऊनमध्ये नाभिक समाजाने शासनाच्या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या काळात राज्यातील आठ ते दहा सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. आता पुन्हा ३० एप्रिलपर्यंत बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी एकावेळी एकच ग्राहक तसेच सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क या गोष्टींचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. यावेळी नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, मोहन चव्हाण, सतीश चव्हाण, राहुल टिपुगडे, अविनाश यादव, विवेक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
--
फोटो नं ०६०४२०२१-कोल-नाभिक निवेदन
ओळ : कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकान मालक जनसेवा संघाच्या वतीने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना सलून, पार्लर व्यवसायाची परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
--