काही तास दुकान उघडण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:16+5:302021-04-08T04:24:16+5:30
सुवर्णकार असोसिएशनची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. तो मान्य असून, पूर्णत: ...
सुवर्णकार असोसिएशनची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. तो मान्य असून, पूर्णत: व्यवसाय बंद करणे हे चुकीचे आहे. अर्धा दिवस अथवा ठरावीक तास दुकान उघडण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी परिसर सराफ व सुवर्णकार असोसिएशनने प्रांत कार्यालय व आमदार प्रकाश आवाडे यांना दिले.
निवेदनात, गेल्या दोन वर्षांपासून शहरात महापूर व कोरोनामुळे व्यवसाय ५० टक्क्यांवर आला आहे. व्यवसाय बंद ठेवल्यास दुकान भाडे, बॅँकेचे हप्ते व वीज बिलाचा बोजा वाढणार आहे. सोने व चांदीच्या भाववाढीमुळे व्यापार कमी आहे. त्यातच वर्षातील मोठा सण गुढीपाडवा आणि लग्न समारंभामुळे व्यवसाय सुरू झाला होता. तोपर्यंतच लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे अधिक अडचणी निर्माण होणार असल्याने नियमांचे पालन करून व्यापार करू द्यावा, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष सचिन देवरूखकर, राजू कदम, सचिन कापसे, प्रमोद कुंभार, उदय लोले, इम्तियाज शेख, आदींचा समावेश होता.