गडहिंग्लजमधील दुकाने सरसकट उघडण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:53 AM2021-07-08T10:53:06+5:302021-07-08T10:57:11+5:30

CoronaVirus Collcator Kolhapur :कांही नियम व अटी लावून उघडण्यास कोल्हापूर शहरातील दुकाने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गडहिंग्लज शहर व तालुक्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जनता दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

Allow shops in Gadhinglaj to open wide | गडहिंग्लजमधील दुकाने सरसकट उघडण्यास परवानगी द्या

गडहिंग्लजमधील दुकाने सरसकट उघडण्यास परवानगी द्या

Next
ठळक मुद्देगडहिंग्लजमधील दुकाने सरसकट उघडण्यास परवानगी द्या जनता दलाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज :कांही नियम व अटी लावून उघडण्यास कोल्हापूर शहरातील दुकाने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गडहिंग्लज शहर व तालुक्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जनता दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक व सहकाऱ्यांनी शिष्टमंडळाने भेटून येथील प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना हे निवेदन दिले. कोल्हापूरला एक व गडहिंग्लजला वेगळा न्याय का ? असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनसंदर्भात शासनाने घेतलेली भूमिका व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने तब्बल तीन महिने बंद असल्यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने व्यापाºयांच्या मदतीची भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर, नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई, सुनिता पाटील, क्रांतीदेवी शिवणे व वीणा कापसे, राजेंद्र भुर्इंबर, गंगाराम विभुते, सलीम नदाफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Allow shops in Gadhinglaj to open wide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.