चष्मे दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:05+5:302021-04-20T04:24:05+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने एका बाजूने डोळ्यांच्या दवाखान्यांना परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यातील चष्म्याची दुकाने मात्र, बंद आहेत. त्यामुळे ...
कोल्हापूर : राज्य शासनाने एका बाजूने डोळ्यांच्या दवाखान्यांना परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यातील चष्म्याची दुकाने मात्र, बंद आहेत. त्यामुळे लोकांना सेवा कशी पुरवायची असा प्रश्न चष्मे दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे शासनाने या दुकानदारांना लेखी परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.
सध्या लोकांमध्ये डोळे दुखणे, मान दुखणे, डोळ्यात पाणी येणे, लांबचा व जवळचे न दिसणे, अशा तक्रारी सुरू आहेत. डाॅक्टरांनी चष्मे करून घेण्यासाठी चिठ्ठी दिलेली आहे. मात्र, त्या नागरिकांना चष्मे दुकाने बंद असल्यामुळे करून वेळेवर मिळत नाहीत. अनेक दुकानदारांना फोनवरून रुग्णाच्या मागणीनुसार चष्मे बनवून देताना अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चष्मे दुकानदारांना लेखी परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनतर्फे अध्यक्ष मोहंमदअली मोमीन यांनी केली आहे.