प्रायव्हेट क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:52+5:302021-08-28T04:26:52+5:30

सुशिक्षित बेरोजगारांनी त्यांच्या कर्तृत्व, ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सुरू केलेला पारंपरिक व्यवसाय आहे. कोरोनामुळे गेल्या १५ महिन्यांपासून क्लासेसचा व्यवसाय ...

Allow to start private classes | प्रायव्हेट क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्या

प्रायव्हेट क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्या

Next

सुशिक्षित बेरोजगारांनी त्यांच्या कर्तृत्व, ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सुरू केलेला पारंपरिक व्यवसाय आहे. कोरोनामुळे गेल्या १५ महिन्यांपासून क्लासेसचा व्यवसाय ठप्प आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार क्लास संचालक, वीस हजार सहशिक्षक, कर्मचारी आणि एक लाखाहून अधिक कुटुंब सदस्य या व्यवसायावर अवलंबून आहेत. तसेच त्यावर शैक्षणिक साहित्य, पुस्तक विक्री, झेरॉक्स, खानावळ, वसतिगृह, आदी व्यवसाय आधारित आहेत. क्लासेस बंद असले, तरी जागेचे भाडे, वीज आणि पाणी बिल, कर्जाचे हप्ते, अन्य कर, घर खर्च थांबलेला नाही. त्याचा विचार करून शासनाने प्रायव्हेट क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. असोसिएशनच्या शिष्टमंडळात उपाध्यक्ष प्रा. अतुल निंगुरे, संजय यादव, नारायण निळफणकर, विवेक हिरवडेकर, उत्तम मेथे, रंगराव जाधव, बाजीराव जठार, आदींचा समावेश आहे.

Web Title: Allow to start private classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.