जिल्हा परिषदेत शाहू पुरस्कारांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:21+5:302021-06-09T04:31:21+5:30

जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी पाच जिल्हा परिषद सदस्य आणि १५ कर्मचाऱ्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात येते. सदस्यांची एकूणच कामगिरी आणि कर्मचाऱ्यांनी ...

Almost Shahu awards in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत शाहू पुरस्कारांची लगबग

जिल्हा परिषदेत शाहू पुरस्कारांची लगबग

Next

जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी पाच जिल्हा परिषद सदस्य आणि १५ कर्मचाऱ्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात येते. सदस्यांची एकूणच कामगिरी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकरीमध्ये केलेले काम याचा विचार करून निकषांच्या आधारे ही पुरस्कार निवड केली जाते. परंतु काही वेळा निकष डावलूनही पुरस्कार दिल्यामुळे हे पुरस्कार चर्चेत येतात.

यंदा सामान्य प्रशासन विभागाने १५ जूनपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत. यानंतर १७ जूनला प्राथमिक तर २१ जूनला पुरस्कार निवडीची अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. या पुरस्कारांबरोबरच जिल्हास्तरीय १ आणि तालुकास्तरीय १२ पत्रकारांना देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठीही प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या सर्व पुरस्कारांची घोषणा शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे २५ जून रेाजी होण्याची शक्यता आहे.

चौकट

सर्वपक्षीयांना स्थान

सदस्यांना पुरस्कार देताना अनेकदा सर्व पक्षांना समान न्याय देण्याचा प्रयत्न असतो. परंतु काही वेळा हा निकष देखील बाजुला पडतो. आता या सभागृहाची मुदत संपणार आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांत काही महत्त्वाचे सदस्य राहिले असतील तर अशांचा यावेळी विचार होवू शकतो.

Web Title: Almost Shahu awards in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.