पीआरसीआयच्या पश्चिम विभागीय सहसचिवपदी आलोक जत्राटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 06:51 PM2020-09-03T18:51:48+5:302020-09-03T18:52:23+5:30

शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)) या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम विभागाच्या सहसचिव पदावर निवड झाली आहे. या विभागाअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण व दीव, छत्तीसगढ आणि ओडिशा ही राज्ये येतात.

Alok Jatratkar as PRCI West Divisional Joint Secretary | पीआरसीआयच्या पश्चिम विभागीय सहसचिवपदी आलोक जत्राटकर

पीआरसीआयच्या पश्चिम विभागीय सहसचिवपदी आलोक जत्राटकर

Next
ठळक मुद्देपीआरसीआयच्या पश्चिम विभागीय सहसचिवपदी आलोक जत्राटकरपश्चिम विभागाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा ऑनलाईन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)) या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम विभागाच्या सहसचिव पदावर निवड झाली आहे. या विभागाअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण व दीव, छत्तीसगढ आणि ओडिशा ही राज्ये येतात.

पीआरसीआय- पश्चिम विभागाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा दि. १ सप्टेंबर रोजी संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस यु.एस. कुट्टी यांनी ऑनलाईन पद्धतीने केली. त्यामध्ये पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी अविनाश गवई (पुणे) यांची, तर सहसचिवपदी डॉ. जत्राटकर यांच्या नावांची घोषणा केली.

पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरच्या माध्यमातून कोल्हापूर परिसरातील विविध क्षेत्रांत कार्यरत जनसंपर्क व्यावसायिकांचे संघटन, राबविलेले उपक्रम तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांतील सक्रिय सहभाग आदी बाबींची नोंद घेऊन संस्थेने डॉ. जत्राटकर यांची निवड केली आहे.

 

Web Title: Alok Jatratkar as PRCI West Divisional Joint Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.