ठरावाबरोबर सचिव, अध्यक्ष अन् प्रोसेंडिंगही दुबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:27 PM2021-03-04T12:27:13+5:302021-03-04T12:29:01+5:30
Gokul Milk Kolhapur-कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दुबार ठरावांची बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये दोन सचिव, दोन अध्यक्षांसह प्रोसेंडिंग दोन दाखल करून ठरावावर दावे करण्यात आले. कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन दूध संस्थांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. संचालक मंडळाचे समान बलाबल आहे, मात्र सचिवाने मखलाशी केल्याने ठरावाचा गुंता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दुबार ठरावांची बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये दोन सचिव, दोन अध्यक्षांसह प्रोसेंडिंग दोन दाखल करून ठरावावर दावे करण्यात आले. कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन दूध संस्थांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. संचालक मंडळाचे समान बलाबल आहे, मात्र सचिवाने मखलाशी केल्याने ठरावाचा गुंता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
ह्यगोकुळह्णच्या प्रारूप यादीवर ३५ दुबार ठराव, तर ४१ इतर हरकती आल्या आहेत. ३५ दुबार ठरावांवर मंगळवार व बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. बुधवारी १९ दूध संस्थांच्या दुबार ठरावांवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सुनावणी घेऊन संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले.
संघाच्या ठरावाला लाखमोलाची किंमत असल्याने प्रतिनिधीच्या नावासाठी संस्थांतर्गत संघर्ष उफाळून येतो. त्यातूनच ८ ठरावधारकांनी आपापसात समझोता करून हरकत मागे घेतली. उर्वरित हरकतीमध्ये संचालक मंडळाची संख्या समसमान आहे, मात्र सचिवाने आपल्या मर्जीतील गटाकडे वजन टाकल्याने पेच निर्माण झाला आहे. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी ठराव केला, मात्र ते अल्पमतात आहेत, अशा तक्रारी सुनावणीदरम्यान समोर आल्या.
कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन संस्थांनी तर चक्क दोन अध्यक्ष, दोन सचिव आणि दोन प्रोसेडिंगच हजर केल्याने अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला. दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतले आहे