फायनान्स कंपन्यांकडून लॉकडाऊनमध्येही वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:04+5:302021-04-20T04:26:04+5:30
जिल्ह्यामध्ये ४८ नोंदणीकृत फायनान्स कंपन्या आहेत. या कंपन्या दहा ते पंधरा महिलांना एकत्र करून महिला गट तयार करतात. त्यांना ...
जिल्ह्यामध्ये ४८ नोंदणीकृत फायनान्स कंपन्या आहेत. या कंपन्या दहा ते पंधरा महिलांना एकत्र करून महिला गट तयार करतात. त्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी एकत्र एका ठिकाणी बोलावून घेतले जाते. त्यानंतर त्यांना कर्ज पुरवठा करून काही दिवसांनी पुन्हा एकत्र करून आठवड्याला हप्ते वसूल केले जातात. अशा विविध कंपन्यांनी एकाच गटाला नियमबाह्य तीनवेळा वेगवेगळ्या रकमेसह कर्जपुरवठा केला आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये राष्ट्रीय आपत्ती आल्याने रिझर्व्ह बॅंकेने बॅंक व पतसंस्थांसह इतर कर्जवसुलीसाठी स्थगिती दिली होती. तरीही अनेक फायनान्स कंपन्यांकडून नागरिकांना वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून इतरांवर निर्बंध आणले आहेत. तरीही इतर गावांतून येऊन शहरामध्ये हे कर्मचारी घरोघरी जाऊन महिलांकडे वसुली करीत असल्याचे दिसत आहे.