पर्यायी शिवाजी पुलाचे काम पूर्ववत सुरू, ९० लाखांचे बिल मंजुरीची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:02 PM2019-02-09T13:02:04+5:302019-02-09T13:04:56+5:30
गेले चार दिवस अधिकाऱ्याने बिलामध्ये फेरफार केल्याने थांबविलेले पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पूर्ववत सुरू झाले. दिवसभरात पुलाचे बेरिंग बसविण्याचे, तसेच उर्वरित पाच टक्केसळई बसविण्याचे राहिलेले काम सुरूराहिले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता प्रशांत मुंघाटे यांनी स्लॅबसाठी जोडलेली सळईकाम आणि पाण्यात टाकलेल्या मुरुमाच्या भरावाची तपासणी केली. पुलाच्या मुख्य स्लॅबच्या पहिल्या टप्प्यातील स्लॅब हा शुक्रवारपर्यंत (दि. १५) टाकण्यात येईल, अशी माहिती ठेकेदार एन. डी. लाड यांनी दिली.
कोल्हापूर : गेले चार दिवस अधिकाऱ्याने बिलामध्ये फेरफार केल्याने थांबविलेले पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पूर्ववत सुरू झाले. दिवसभरात पुलाचे बेरिंग बसविण्याचे, तसेच उर्वरित पाच टक्केसळई बसविण्याचे राहिलेले काम सुरू राहिले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता प्रशांत मुंघाटे यांनी स्लॅबसाठी जोडलेली सळईकाम आणि पाण्यात टाकलेल्या मुरुमाच्या भरावाची तपासणी केली. पुलाच्या मुख्य स्लॅबच्या पहिल्या टप्प्यातील स्लॅब हा शुक्रवारपर्यंत (दि. १५) टाकण्यात येईल, अशी माहिती ठेकेदार एन. डी. लाड यांनी दिली.
सुमारे दीड कोटी रुपये खर्च करूनही प्रशासनाकडून रुपयाचाही परतावा न मिळल्याने ठेकेदार लाड यांनी सोमवारपासून (दि. ११) पुलाचे काम थांबविले होते. त्यानंतर सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मध्यस्ती करून काम सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या.पुलाच्या कामात बेअरिंग बसविण्याचे, तसेच उर्वरित पाच टक्केराहिलेली सळई जोडण्याचे काम सुरूहोते. मुंघाटे यांनी सुमारे तासभर या कामाची तपासणी केली. पाण्यात टाकलेल्या उच्चतम पातळीच्या एक मीटर उंच भराव्याचेही मोजमाप केले.
९० लाखांचे बिल मंजुरीची प्रक्रिया सुरू
चारवेळा बिलाच्या रकमेत फेरफार केल्यानंतर वादग्रस्त बनलेले उपअभियंता संपत आबदार यांनी मोजमापानूसार पूर्ववत ९० लाखांचे बिल तयार करण्याचे काम सुरूकेले आहे. ते काढण्याची हमी कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी घेतली आहे. हे बिल कार्यकारी अभियंता कांडगावे यांच्या व ठेकेदार लाड यांच्या सहिने मुख्य कार्यकारी अभियंता विनय देशपांडे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे.