पर्यायी शिवाजी पूल : उद्या काँक्रीट टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:37 AM2019-03-14T10:37:26+5:302019-03-14T10:38:57+5:30
पर्यायी शिवाजी पुलाच्या अखेरच्या टप्प्यातील स्लॅबचे काँक्रीट टाकण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता ए. एल. भोसले यांनी प्रथमच बुधवारी दुपारी पुलाच्या कामाची तपासणी केली.
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अखेरच्या टप्प्यातील स्लॅबचे काँक्रीट टाकण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता ए. एल. भोसले यांनी प्रथमच बुधवारी दुपारी पुलाच्या कामाची तपासणी केली.
पर्यायी शिवाजी पुलाचे अंतिम टप्प्यातील काँक्रिटचे काम सुरू आहे. त्यासाठी स्लॅब बांधणीचे काम सुरू आहे. शुक्रवारी हे काँक्रीट टाकण्यात येणार आहे. तत्पूर्वी कार्यकारी अभियंतापदाचा कार्यभार स्वीकारलेले ए. एल. भोसले यांनी बुधवारी दुपारी पर्यायी शिवाजी पुलाला भेट देऊन कामाची तपासणी केली.
यावेळी ठेकेदार एन. डी. लाड हेही उपस्थित होते. भोसले यांनी, या कामाबाबत समाधान व्यक्त करत पुलाचे काम कोणत्याही स्थितीत थांबणार नाही, ते युद्धपातळीवर पूर्ण करून १५ मेपूर्वी या नव्या पुलावरून वाहतूक सुरळीत केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.