गरिबांना घरकुल देताय की बंगला?, दोन खोल्यांसाठी वर्षही पुरेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:44 PM2022-02-17T12:44:14+5:302022-02-17T12:44:35+5:30

घरकुल मंजूर झाल्यानंतर वर्षभरामध्ये हे घर बांधून पूर्ण व्हावे, अशी शासनाने अट घातली आहे; परंतु सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘ब’ यादीतील १४९५ घरे वर्ष झाले तरी बांधून पूर्ण झालेली नाहीत.

Although the houses have been sanctioned, the houses have not been completed in kolhapur | गरिबांना घरकुल देताय की बंगला?, दोन खोल्यांसाठी वर्षही पुरेना

गरिबांना घरकुल देताय की बंगला?, दोन खोल्यांसाठी वर्षही पुरेना

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी केली जाते. यातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून घर बांधकामासाठी निधी मिळतो. घरकुल मंजूर झाल्यानंतर वर्षभरामध्ये हे घर बांधून पूर्ण व्हावे, अशी शासनाने अट घातली आहे; परंतु सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘ब’ यादीतील १४९५ घरे वर्ष झाले तरी बांधून पूर्ण झालेली नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्राधान्ययादीमध्ये घरकुल योजना अग्रस्थानी ठेवली आहे. त्यामुळे राज्य पातळीवरूनही याचा आढावा सातत्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे घेत असतात. राज्यामध्ये तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे काम चांगले आहे; परंतु तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे घरबांधणीला उशीर होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना आणि महापूर यांचा मोठा अडथळा यामध्ये निर्माण झाला होता.

ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचे या योजनेतून किती काम झाले यावर रँकिंग ठरविले आहे. रोज या विभागाच्या सॉफ्टवेअरवर किती घरे बांधून पूर्ण झाली आहेत, याची माहिती अपलोड केली जाते. त्यावर रोजचे रँकिंग ठरविले जाते. याच धर्तीवर तालुक्यांचेही रँकिंग ठरविण्यात आले आहे.

कोरोना, पुराची अडचण

गेल्या दोन वर्षांत घरकुल बांधकाम योजनेत कोरोना आणि महापुराचा बसलेला तडाखा या कारणांमुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याआधी केवळ जागांच्या वादामुळे काही घरकुलांना विलंब होत होता; परंतु पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत कामेच बंद ठेवण्यात आल्याने त्याचा परिणाम झाला. तसेच करवीर, शिरोळ, हातकणंगलेसह अन्य तालुक्यांमध्ये महापूर आल्यानेही त्याचा परिणाम घरकुल उभारणीवर झाला आहे.

बांधकामासाठी गरिबांवर झाले कर्ज

आधी ठरावीक टप्प्यापर्यंत घराचे बांधकाम झाल्यानंतर मगच शासनाकडून अनुदान अदा केले जाते. त्यामुळे काही ठिकाणी अशा कामाला सुरुवात झाली. नंतर कोरोना, महापुरासारख्या किंवा घरगुती अडचणी आल्या. काम थांबले आणि आता त्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याची काळजी काहीजणांना लागून राहिली आहे.
 
तालुका          रँकिंग
आजरा            १
गगनबावडा     २
शाहूवाडी        ३
हातकणंगले    ४
शिरोळ           ५
कागल            ६
आजरा           ६
पन्हाळा          ७
भुदरगड         ७
गडहिंग्लज      ८
करवीर           ९
चंदगड           १०

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी?

तालुका           लाभार्थी
आजरा            ८८
गगनबावडा     ६२
भुदरगड         १६०
चंदगड           ११६
गडहिंग्लज      २९०
हातकणंगले    २२९
कागल            १८१
करवीर           १७७
पन्हाळा          १४१
राधानगरी       १६६
शाहूवाडी        १२३
शिरोळ           ३०७

Web Title: Although the houses have been sanctioned, the houses have not been completed in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.