‘करवीर’मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव पुढे - चंद्रदीप नरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:02+5:302021-08-18T04:29:02+5:30
कोल्हापूर : करवीर मतदारसंघातील महापुरासह इतर आपत्तीमध्ये कधी मागे थांबलो नाही. यापुढेही त्याच ताकदीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे राहू, अशी ...
कोल्हापूर : करवीर मतदारसंघातील महापुरासह इतर आपत्तीमध्ये कधी मागे थांबलो नाही. यापुढेही त्याच ताकदीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे राहू, अशी ग्वाही माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
नागदेववाडी (ता. करवीर) येथे पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र दिवसे होते. राजेंद्र दिवसे म्हणाले, नागदेववाडीसह परिसरातील गावांत महापुराने मोठे नुकसान झाले असून, शासनाने तातडीने या कुटुंबांना मदत द्यावी. यावेळी सरपंच योगेश ढेंगे, उपसरपंच शिवानी दिवसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राम पाटील, बाबूराव दिवसे, बाळासाहेब दिवसे, सर्जेराव दिवसे, उत्तम निगडे, पोपट दिवसे, विलास ढेंगे, दिलीप दिवसे, संजय कोंडेकर, महादेव मोहिते, युवराज आमते, विठ्ठल दिवसे, शिवाजी मोहिते, वसंत पाटील, रवी पोतदार, ग्रामसेविका प्रियांका पाटील, सुप्रिया कामिरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र दिवसे, योगेश ढेंगे, शिवानी दिवसे आदी उपस्थित होते. (फोटो-१७०८२०२१-कोल-नागदेववाडी)