भाजपतर्फे अमल महाडिक निश्चित ?

By admin | Published: September 14, 2014 12:32 AM2014-09-14T00:32:44+5:302014-09-14T00:35:30+5:30

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल महाडिक

Amal Mahadik fixed by BJP? | भाजपतर्फे अमल महाडिक निश्चित ?

भाजपतर्फे अमल महाडिक निश्चित ?

Next

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल महाडिक यांची भाजपतर्फे उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे आज, शनिवारी स्पष्ट झाले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात त्यांची लढत होणार आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अमल महाडिक यांनी आज कोल्हापूर विमानतळावर भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे या घडामोडींना वेग आला.
दोनच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या महायुतीच्या जागा वाटपावेळीच अमल यांचे नाव भाजपकडून पुढे आले होते. त्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. ११) प्रसिद्ध केल्यावर राजकारणात खळबळ उडाली. महाडिक यांनी उमेदवारी घ्यावी म्हणून भाजपच त्यांना पायघड्या घालत आहे. मुख्यत: आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने या घडामोडी होत आहेत.
निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय महाडिक यांना घ्यायचा होता. काल त्यासंदर्भात त्यांची प्राथमिक चर्चा झाल्यावर गडकरी यांच्या स्वागतासाठी अमल यांनी जावे, अशा सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. त्यानुसार अमल यांनी जाऊन गडकरी यांचे स्वागत केले.
वर्चस्वाचा वाद पेटणार
दोनच दिवसांपूर्वी महाडिक यांच्या शिरोलीतील निवासस्थानी या मतदारसंघातील संभाव्य इच्छुक ‘जनसुराज्य’चे प्रा. जयंत पाटील, प्रताप कोंडेकर यांच्यासह पाच इच्छुकांची महाडिक यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामध्ये आमच्यापैकी कुणीही अथवा अमल यांनी निवडणूक लढवावी व त्यास सगळ््यांनी पाठिंबा द्यावा, अशी चर्चा झाली. त्यानंतर यासंबंधीच्या घडामोडींना वेग आला. अमल महाडिक यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू देण्यात सतेज पाटील यांनी केलेला विरोध हे या वादाचे मूळ कारण आहे. सतेज पाटील व आमदार महाडिक यांच्यातील मूळचा राजकीय वर्चस्वाचा वाद लोकसभा निवडणुकीवेळी तात्पुरता शमला होता. आता अमल यांच्या उमेदवारीने तो पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Amal Mahadik fixed by BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.