गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर कोल्हापुरात अमल महाडिक, यड्रावकर, आवाडे, समरजित घाटगेंचे उमेदवारी अर्ज दाखल

By समीर देशपांडे | Published: October 24, 2024 05:42 PM2024-10-24T17:42:38+5:302024-10-24T17:45:16+5:30

जिल्ह्यात २२ जणांचे अर्ज दाखल : के. पी., ऋतुराज, राहुल पाटील यांचे साधेपणाने अर्ज

Amal Mahadik, Rajendra Patil Yadravkar, Rahul Awade, Samarjit Ghatge filed nomination papers in Kolhapur on the occasion of Gurupushyamrita for assembly elections | गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर कोल्हापुरात अमल महाडिक, यड्रावकर, आवाडे, समरजित घाटगेंचे उमेदवारी अर्ज दाखल

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर कोल्हापुरात अमल महाडिक, यड्रावकर, आवाडे, समरजित घाटगेंचे उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत गुरुवारी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत, तर काहींनी साधेपणाने अर्ज भरले. वाद्यांच्या गजरात, झेंडे फडकावत, गळ्यात मफलर घालून हजारो कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. विधानसभेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे जिल्ह्यात दिसून आले. अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातून २२ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले आहेत.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी राधानगरी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वत:च्या शाहू आघाडीतर्फे अर्ज दाखल केला. कागलमधून शाहू समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी आजचा मुहूर्त साधण्यासाठी साधेपणाने अर्ज दाखल केला, तर याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. घाटगे यांच्या पत्नी नवोदिता, ऋतुराज यांच्या पत्नी पूजा आणि महाडिक यांच्या पत्नी शौमिका यांनीही पतींसमवेत आपले अर्ज दाखल केले.

शाहूवाडीमधून आमदार विनय कोरे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत सभाही घेतली. तर, इचलकरंजीत राहुल आवाडे यांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. करवीर मतदारसंघातून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि जनसुराज्यचे संताजी घोरपडे यांनी अर्ज दाखल केला. शाहूवाडीमधून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनीही अर्ज दाखल केला.

विधानसभानिहाय अर्ज दाखल

चंदगड
संग्राम कुपेकर अपक्ष
प्रकाश रेडेकर अपक्ष

राधानगरी
के. पी. पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रणजितसिंह कृष्णराव पाटील, अपक्ष

कागल
नवोदिता समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे, अपक्ष
समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

कोल्हापूर दक्षिण
ऋतुराज संजय पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पूजा ऋतुराज पाटील, अपक्ष
अमल महादेवराव महाडिक, भारतीय जनता पार्टी
शौमिका अमल महाडिक, भारतीय जनता पार्टी
सागर राजेंद्र कुंभार, अपक्ष
संतोष गणपती बिसुरे, अपक्ष
वसंत जिवबा पाटील, अपक्ष

करवीर
राहुल पांडुरंग पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेजस्विनी राहुल पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संताजी फत्तेसिंगराव घोरपडे, जन सुराज्य शक्ती

कोल्हापूर उत्तर
निरंक

शाहूवाडी
सत्यजित बाबासाहेब पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
विनय विलासराव कोरे, जनसुराज्य शक्ती

हातकणंगले
निरंक

इचलकरंजी
प्रकाश कल्लाप्पा आवाडे, भारतीय जनता पार्टी
राहुल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पार्टी
राहुल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पार्टी
सॅम ऊर्फ सचिन शिवाजी आठवले, अपक्ष

शिरोळ
राजेंद्र श्यामगोंडा पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी

Web Title: Amal Mahadik, Rajendra Patil Yadravkar, Rahul Awade, Samarjit Ghatge filed nomination papers in Kolhapur on the occasion of Gurupushyamrita for assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.