हौशी कोल्हापूरकर! सोन्याच्या कात्रीने कापले केस; सलून व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 08:12 PM2020-06-28T20:12:54+5:302020-06-28T20:14:48+5:30
सलून सुरू झाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा
कोल्हापूर: तब्बल तीन महिन्यांनंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजारामपुरी येथील रामभाऊ संकपाळ या सलून चालकाने रविवारी दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकांचे चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापले. दुकान सुरू झाल्यावर पहिल्या ग्राहकांचे सोन्याच्या कात्रीने केस कापेन, असा संकल्प रामभाऊ संकपाळ यांनी केला होता. त्यांनी तो पूर्ण केला. त्यातून ह्यहौशी कोल्हापूरकर या उक्तीचा प्रत्यय आला.
अटी आणि शर्तींवर सलूनमध्ये फक्त कटिंग आणि हेअरडाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तीन महिन्यांनंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजामध्ये आनंद आहे. सलून बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने या सलूनचालकांनी आंदोलनही केल होतं. राज्यभरात चार-पाच सलूनचालकांनी आत्महत्याही केल्या. त्याची दखल घेऊन सरकारने फक्त कटिंग करायला परवानगी दिली आहे.
नाभिकबांधव रामभाऊ संकपाळ यांनी सलून सुरू करताच त्यांच्या ह्यमिरर सलूनह्णमध्ये आलेल्या ग्राहकांचे चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापले. सलून बंद झाल्याने अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. व्यवसायासाठी घेतलेल्या कजार्चा प्रश्नही होता. अखेर शासनाने परवानगी दिल्याने त्यांच्या दृष्टीने रविवार हा ह्य सोन्याचा दिवसह्ण होता. त्यामुळे संकपाळ यांनी दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकांचे सोन्याच्या कात्रीने केस कापले.
जावळाच्या कार्यक्रमासाठी लोकांचा आग्रह असल्याने सलून व्यवसायातून पै-पै जमा करून दीड वर्षांपूर्वी सोन्याची कात्री घेतली. तीन महिन्यांनंतर सलून सुरू झाल्याचा आनंद म्हणून पहिल्या ग्राहकाचे केस सोन्याच्या कात्रीने कापले. शासनाने नाभिक समाजाला आर्थिक मदत द्यावी.
- रामभाऊ संकपाळ (मिरर हेअर ब्युटी सलून, राजारामपुरी, कोल्हापूर)