Ambabai Kirnotsav: दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत, आज पूर्ण क्षमतेने किरणोत्सवाची शक्यता

By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 11, 2022 02:40 PM2022-11-11T14:40:20+5:302022-11-11T14:41:00+5:30

थंडी व धुके असले तरी किरणांची तीव्रता चांगली

Ambabai Kirnotsav: second day to the neck of Suryakarne Devi | Ambabai Kirnotsav: दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत, आज पूर्ण क्षमतेने किरणोत्सवाची शक्यता

छाया : नसीर अत्तार

googlenewsNext

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात गुरुवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. आज शुक्रवारी किरणोत्सवाचा तिसरा दिवस असून, आज किरणे चेहऱ्यावर येऊन पूर्ण क्षमतेने हा सोहळा होण्याची शक्यता आहे.

अंबाबाईच्या किरणोत्सवाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. थंडी व धुके असले तरी किरणांची तीव्रता चांगली होती. सायंकाळी ५ वाजून १ मिनिटानी सूर्यकिरणांनी महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश केला. गरुड मंडप, शंखतीर्थ चौक, पितळी उंबरा, चांदीचा उंबरा असा प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४४ मिनिटांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला. ५ वाजून ४८ मिनिटांनी गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. या वेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, मंदिर अभ्यासक गणेश नेर्लीकर, प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.

सूर्यकिरणांचा प्रवास असा
वेळ : प्रवास
५ वाजून १ मिनिटे : महाद्वार
५ वाजून ९ मिनिटे : गरुड मंडप
५ वाजून २७ मिनिटे : गणपती चौक
५ वाजून ३१ मिनिटे : शंखतीर्थ चौक
५ वाजून ३४ मिनिटे : पितळी उंबरा
५ वाजून ३६ मिनिटे : खजिना चौक
५ वाजून ३८ मिनिटे : चांदीचा उंबरा
५ वाजून ४४ मिनिटे : चरणस्पर्श
५ वाजून ४५ मिनिटे : गुडघ्यापर्यंत
५ वाजून ४६ मिनिटे : कमरेपर्यंत
५ वाजून ४७ मिनिटे : खांद्यापर्यंत
५ वाजून ४८ मिनिटे : गळ्यापर्यंत

Web Title: Ambabai Kirnotsav: second day to the neck of Suryakarne Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.