Ambabai Kirnotsav: सलग दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या मुखावर
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 12, 2022 06:58 PM2022-11-12T18:58:54+5:302022-11-12T18:59:25+5:30
उद्या, रविवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सलग दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर आली. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सूर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. उद्या, रविवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव सुरू झाल्यानंतर काल, शुक्रवारी अंधुकशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर आली होती. शनिवारीदेखील सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी किरणे चेहऱ्यावरून पुढे किरीटापर्यंत येऊन लुप्त झाली. किरणे एक मिनिटभर देवीच्या चेहऱ्यावर विसावली. देवीच्या किरणोत्सव सलग दुसऱ्यांदा पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांमध्ये अलौकिक सोहळा पाहिल्याचा आनंद होता. किरणोत्सवानंतर देवीची आरती झाली.
४ वाजून ५९ मिनिटांनी किरणे महाद्वारवर आलीत. यानंतर ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणांनी देवीस चरणस्पर्श केला. अन् ५ वाजून ४८ मिनिटांनी किरणे चेहऱ्यावर येवून ५ वाजून ४९ मिनिटाला लुप्त झाली.