अंबाबाई मंदिरातील सनईचा सूर लुप्त झाला, चंद्रकांत पोवार यांचे निधन

By भारत चव्हाण | Published: July 15, 2022 12:19 PM2022-07-15T12:19:12+5:302022-07-15T12:19:58+5:30

चंद्रकांत पोवार हे गेली ३५ वर्षे पिढीजात सनई वादक म्हणून काम करीत होते.

Ambabai temple clarinet player Chandrakant Akharam Powar passed away due to heart attack | अंबाबाई मंदिरातील सनईचा सूर लुप्त झाला, चंद्रकांत पोवार यांचे निधन

अंबाबाई मंदिरातील सनईचा सूर लुप्त झाला, चंद्रकांत पोवार यांचे निधन

Next

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या नित्य नैमित्तिक विधींच्यावेळी सनईच्या मंजूळ सुरांची सेवा देणारे चंद्रकांत आकाराम पोवार (वय ५६, रा. बोंद्रेनगर) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांंच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भावंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.

अंबाबाई मंदिरात देवीचे अनेक मानकरी पिढ्यानपिढ्यांपासून देवीच्या चरणी आपली सेवा देत आहेत. त्यापैकी एक असलेले चंद्रकांत पोवार हे गेली ३५ वर्षे पिढीजात सनई वादक म्हणून काम करीत होते. त्यांचे वडील आकाराम पोवार हेदेखील मंदिरात सनई वाजवायचे. मंदिरात पहाटे साडेपाच ते सहा यावेळेत नगारखान्यावर, त्यानंतर सकाळी साडेनऊ व दुपारची साडेबाराची आरती, सायंकाळी साडेसातची आरती याशिवाय पालखी सोहळ्याच्यावेळी पालखीच्यापुढे अशा वेगवेगळ्या धार्मिक विधींच्या व नित्य नैमित्तिक विधींच्यावेळी ते देवीपुढे सनई वाजवायचे.

Web Title: Ambabai temple clarinet player Chandrakant Akharam Powar passed away due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.