अंबाबाई मंदिर खुले करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:28+5:302021-08-14T04:29:28+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून अंबाबाई मंदिर बंद असल्याने मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा ...
कोल्हापूर : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून अंबाबाई मंदिर बंद असल्याने मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने सर्व व्यवसाय, उद्योगांना परवानगी दिली आहे, त्याचप्रमाणे मंदिर खुले करून व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह व्यावसायिकांनी केली. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
अंबाबाई मंदिरावर फूल, हार, गजरे विक्रेते, रिक्षाचालक, मिठाईवाले, वात, निरंजन, पूजा साहित्य विक्रेते, फेरीवाले, असे अनेक व्यावसायिक अवलंबून आहेत. पहिल्या लाटेतील कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात होते. पुढचे तीन महिने सणांचा कालावधी असल्याने या काळात व्यवसाय चांगला होतो. याचा विचार करून मंदिर खुले करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी महेश उरसाल, नंदकुमार मराठे यांच्यासह महालक्ष्मी भक्त मंडळ, हक्कदार पुजारी मंडळ, पालखी मंडळ, महाद्वार व्यापार मंडळ, जोतिबा रोड फूल मार्केट, फेरीवाले संघटना, रिक्षा मित्रमंडळ, अशा विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
---