अंबाबाईला तिरुपती शालूची पद्धत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:52 PM2017-09-19T18:52:06+5:302017-09-19T18:58:49+5:30

अंबाबाई म्हणजेच विष्णूपत्नी लक्ष्मी या गैरसमजातून देवस्थान समितीनेच वीस वर्षांपूर्वीपासून अंबाबाईला दसºयाला तिरुपती शालू नेसवण्याची पद्धत यंदाच्या वर्षीपासून बंद करण्यात आली आहे.

Ambabai Tirupati Shalu method closed | अंबाबाईला तिरुपती शालूची पद्धत बंद

अंबाबाईला तिरुपती शालूची पद्धत बंद

Next
ठळक मुद्देदसºयाला अंबाबाईला देवस्थानचे महावस्त्रदेवस्थान समिती सुधारणार चूकशालू पाठवण्याचे तिरुपती देवस्थानला यंदा पाठवले नाही पत्र

कोल्हापूर : अंबाबाई म्हणजेच विष्णूपत्नी लक्ष्मी या गैरसमजातून देवस्थान समितीनेच वीस वर्षांपूर्वीपासून अंबाबाईला दसºयाला तिरुपती शालू नेसवण्याची पद्धत यंदाच्या वर्षीपासून बंद करण्यात आली आहे.

समितीने आपली चूक सुधारत तिरुपती शालूचा सर्व डामडौल बंद करुन विजयादशमी(दसºयाला) देवीला समितीतर्फे देण्यात येणारे महावस्त्रच नेसवण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.


शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनासंबंधी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षिरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, प्रमोद पाटील, सचिव विजय पोवार, सहसचिव एस.एस. साळवी, महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, दरवर्षी देवस्थान समितीच्यावतीने तिरुपती देवस्थानला अंबाबाईला शालू पाठवा अशा आशयाचे पत्र पाठवले जाते मात्र यंदा आम्ही असे कोणतेही पत्र पाठवलेले नाही. तरिही तिरुपती देवस्थानच्यावतीने शालू आलाच तर त्याची कोणतिही मिरवणूक काढण्यात येणार नाही किंवा डामडौल होणार नाही.

अन्य भक्त देवीला साडी अर्पण करतात त्याचप्रमाणे शालू स्विकारला जाईल. हा शालू अंबाबाईला कधी नेसवायचे हे पुढे बघू, आणि नेसवला तरी त्याचा लिलाव होणार नाही.

दसºयाच्या दिवशी अंबाबाईसह महासरस्वती, महाकाली या तीनही देवतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे शालू अर्पण करण्यात येत आहे. हेच महावस्त्र देवींना परिधान केले जाईल.

अष्टमीला ढोल पथक नाही

अष्टमी दिवशी अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणेत दरवर्षी ढोल पथकांचा समावेश असतो. गतवर्षी जवळपास तीन ढोल पथक या सोहळ््यात सहभागी झाले होते. त्यामुळे वादाचा प्रसंग उदभवण्याची शक्यता असल्यानं यंदा नगरप्रदक्षिणेसाठी कोणत्याही ढोल पथकाला परवानगी देण्यात आलेली नाही. पारंपारिक बंँंड पथकच या सोहळ््यात सहभागी असेल. 

Web Title: Ambabai Tirupati Shalu method closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.