अंबाबाईचे दर्शन होणार आता दिवसभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:50+5:302021-03-19T04:22:50+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. भाविकांना सकाळी सात ते सायंकाळी ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. भाविकांना सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत अंबाबाईसह ओढ्यावरील गणपती, श्री दत्तभिक्षालिंग, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली, कात्यायनी देवी बालिंगा व पंचमुखी मारुती बागल चौक या देवतांचे दर्शन घेता येईल. सहानंतर सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद राहतील.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशी अंबाबाई दर्शनाची वेळ ठेवली होती. मात्र, याकाळात मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत होती. बुधवारी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर समितीने दशर्नाच्या वेळेत बदल केला. भाविकांनी दिलेल्या वेळेत दर्शन घ्यावे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे व सायंकाळी सहानंतर मंदिर व आवारात गर्दी करु नये, असे आवाहन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.
---
अंबाबाईचा फोटो वापरावा
--