अंबाबाईची नागांना दर्शनरूपात पूजा; नवरात्रौत्सवातील तिसरी माळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 06:06 PM2020-10-19T18:06:25+5:302020-10-19T18:07:41+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.
नवरात्रौत्सवांतर्गत सोमवारी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची सालंकृत पूजा बांधण्यात आली.
करवीर महात्म्यामधील स्तोत्रांमध्ये यामागची कथा नमूद आहे. पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठी तपोसाधनेची झळ नागलोकांना होऊ लागते.
त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात. मात्र, शेवटी शापाच्या भीतीने ते पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यासाठी जागा सुचविण्याची विनंती करतात. तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीरक्षेत्रात जाऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीलाच विचारण्यास सांगतात. ही पूजा पुजारी मकरंद मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी बांधली.