अंबाबाईच्या अभिषेकाला आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:43+5:302020-12-12T04:40:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनानंतर आठ महिन्यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांकडून केले जाणारे अभिषेक आज, शनिवारपासून पूर्ववत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनानंतर आठ महिन्यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांकडून केले जाणारे अभिषेक आज, शनिवारपासून पूर्ववत सुुरू करण्यात आले आहेत. याशिवाय देवीच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन व सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. देवस्थान समितीच्या शुक्रवारी झालेल्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
समितीच्या मुख्य कार्यालयात समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी भाविकांसाठी अंबाबाई, केदारलिंग जोतिबा, दत्त भिक्षालिंग, ओढ्यावरील सिद्धिविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरांतील दर्शनवेळ वाढवण्यात आली आहे. आजतागायत कोरोनाच्या भीतीमुळे ओटीचे साहित्य बाहेरच घेतले जात होते. आता मात्र भाविकांना मंदिरात ओटीचे साहित्य नेता येणार आहे. भाविकांसाठी बंद असलेले अभिषेक पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. तसेच देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बाकीच्या मंदिरांच्या वेळेसंदर्भात स्थानिक उपसमिती निर्णय घेईल असे जाधव यांनी सांगितले.
--
तीन वर्षे सेवेचे भाग्य
विद्यमान देवस्थान समिती बरखास्त करून नव्या पदाधिकारी निवडीसाठीच्या जोरदार हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत. या बैठकीत बरखास्तीचा विषय निघाल्यानंतर सर्वांनी तीन वर्षे देवीची सेवा करण्याचे भाग्य लाभले. पुढे शासन निर्णय काय होतो ते बघूया अशी भावना व्यक्त केली.
--
अंबाबाईचा फोटो वापरावा.
---
इंदुमती गणेश