अंबाबाईच्या अभिषेकाला आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:20+5:302020-12-12T04:41:20+5:30

कोल्हापूर : कोरोनानंतर आठ महिन्यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांकडून केले जाणारे अभिषेक आज, शनिवारपासून पूर्ववत सुुरू करण्यात आले ...

Ambabai's anointing starts from today | अंबाबाईच्या अभिषेकाला आजपासून सुरुवात

अंबाबाईच्या अभिषेकाला आजपासून सुरुवात

Next

कोल्हापूर : कोरोनानंतर आठ महिन्यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांकडून केले जाणारे अभिषेक आज, शनिवारपासून पूर्ववत सुुरू करण्यात आले आहे. याशिवाय देवीच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन व सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. देवस्थान समितीच्या शुक्रवारी झालेल्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या मुख्य कार्यालयात समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी भाविकांसाठी अंबाबाई, केदारलिंग जोतिबा, दत्त भिक्षालिंग, ओढ्यावरील सिद्धिविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरातील दर्शनवेळ वाढवण्यात आली आहे. आजतागायत कोरोनाच्या भीतीमुळे ओटीचे साहित्य बाहेरच घेतले जात होते. आता मात्र भाविकांना मंदिरात ओटीचे साहित्य नेता येणार आहे. तसेच भाविकांसाठी बंद असलेले अभिषेक पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. तसेच देवस्थान समितीचे अधिपत्याखाली येणाऱ्या बाकीच्या मंदिराच्या वेळेसंदर्भात स्थानिक उपसमिती निर्णय घेईल, असे जाधव यांनी सांगितले.

विद्यमान देवस्थान समिती बरखास्त करून नव्या पदाधिकारी निवडीसाठीच्या जोरदार हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत.

Web Title: Ambabai's anointing starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.