शुक्रवारपासून महाद्वारातून अंबाबाईचे मुखदर्शन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:16 IST2020-12-30T19:14:26+5:302020-12-30T19:16:10+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur - नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मव्द्वार मुख दर्शनासाठी सुरु करण्यात येत आहे.

शुक्रवारपासून महाद्वारातून अंबाबाईचे मुखदर्शन सुरु
ठळक मुद्देशुक्रवारपासून महाद्वारातून अंबाबाईचे मुखदर्शन सुरुदुकानांनाही परवानगी : सकाळी सहापासून दर्शनास सुरुवात
कोल्हापूर : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मव्द्वार मुख दर्शनासाठी सुरु करण्यात येत आहे.
सकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार असून मंदिर आवारातील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यस्थापन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
समितीच्या शिवाजी पेठ येथील कार्यालयात अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, सचिव विजय पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.